भारत बनला कोरोनाचा हॉटस्पॉट!
देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने आता 42 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तर, मागील 24 तासांमध्ये तब्बल 90 हजार 802 नवे कोरोनाबाधित आढळले असून, 1 हजार 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 42 लाख 4 हजार 614 वर पोहचली आहे. जगात सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या यादीत भारत दुसर्यास्थानी असून, भारताच्या पुढे आता केवळ अमेरिका आहे. देशातील एकूण 42 लाख 4 हजार 614 कोरोनाबाधितांमध्ये 8 लाख 82 हजार 542 अॅक्टिव्ह रुग्ण, डिस्चार्ज देण्यात आलेले 32 लाख 50 हजार 429 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 71 हजार 642 जणांच्या संख्येचा समावेश आहे.